पुणे

‘एनआरआय’ कोट्यात रक्ताच्या नात्याची अट

CD

पुणे, ता. १८ : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनिवासी भारतीय (एनआरआय) कोट्यात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता केवळ थेट रक्ताच्या नात्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची माहिती ‘सीईटी’ कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ‘एनआरआय’च्या व्याख्येत सुधारणा केली आहे. यापूर्वी नातेसंबंधांमधील अस्पष्टतेचा फायदा घेत अपात्र विद्यार्थ्यांनी या कोट्याचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. नवीन नियमांनुसार, विद्यार्थी स्वतः अनिवासी भारतीय असणे किंवा तो ‘एनआरआय’ पालकांचा पाल्य असणे अनिवार्य आहे. यासाठी भारतीय दूतावासाचे प्रमाणपत्र आणि न्यायालयाने मान्यता दिलेले पालकत्वच ग्राह्य धरले जाईल.

प्रवेश संख्येत मोठी घट
या कडक नियमांमुळे प्रवेश संख्येत मोठी घट झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४५४ विद्यार्थ्यांनी या कोट्यातून प्रवेश घेतला होता, तर २०२५-२६ मध्ये ही संख्या केवळ ३४ वर आली आहे. या बदलामुळे केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच या प्रवर्गाचा लाभ मिळेल, असा विश्वास सीईटी कक्षाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT