Nuclear scientist Dr Yashwant Waghmare passed away pune sakal
पुणे

Dr Yashwant Waghmare passed away : अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांचे निधन

डॉ. वाघमारे हे अणुशास्त्रज्ञ होते; नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे (वय 85) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, तसेच दोन बंधू आणि एक बहिण असा परिवार आहे.

डॉ. वाघमारे हे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात काम केले. त्यानंतर आय.आय.टी. कानपूरमध्ये १९६६ ते १९९७ असे प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. या कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. डॉ. वाघमारे सन २००० पासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते.

डॉ. वाघमारे यांनी ८० पेक्षा अधिक शोधनिबंध तसेच न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर सायन्स अँड इंजिनिअरींग, क्वाँटम मेकॅनिक्स, रीलेटिव्हीटी आदी विषयांवर ७ पुस्तकांचे लिखाण केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे.

डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे.

आय.आय.टी. कानपूरमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये ते आवर्जून खेळत असत. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर देखील डॉ. वाघमारे यांच्याशी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापकांचा ऋणानुबंध कायम होता. पुण्यात स्थायिक झालेल्या अनेक सहकाऱ्यांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे घनिष्ठ संबंध होते, अशी आठवण डॉ. संजय धांडे यांनी सांगितली.

आय. आय. टी. कानपूरमध्ये डॉ. वाघमारे यांनी फिजिक्स विभागाचे प्रमुख, विद्यार्थी कल्याण व विकास विभागाचे अधिष्ठाता आणि अनेकदा कार्यवाहक डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT