पुणे

आंबेगाव तालुक्यात धोक्याची घंटा; कोरोना बाधितांची संख्या वाढली

डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात मंचर, अवसरी खुर्द गावडेवाडी, पारगाव, मेंगडेवाडी, लाखणगाव आदि गावात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा  वाढत आहे. शनिवारी (ता.१२) तालुक्यात एकूण आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये मंचर तीन, अवसरी खुर्द चार व चास येथील एकाचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसात अवसरी खुर्द गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. 

“कोरोना साथ  संपुष्ठात आली असे समजून दिवाळीनंतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.सोशल डीस्टन्सचा बोजवारा उडविला आहे.मास्क न वापरता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी सारखी असलेली कोरोनाची भीती कमी झाली आहे.त्यामुळेच कोरोना वाढला आहे.” अशी माहिती अवसरी बुद्रुक(ता.आंबेगाव) येथील उद्योजक संजय चव्हाण यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता.१२) रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार हजार ५५ असून मृत्य झालेल्यांची संख्या १११ आहे. १५५ जणांवर उपचार सुरु आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात सुरु केलेल्या कोव्हीड उपचार केंद्रात रुग्णांवर उपचार केले जातात. ऑक्सिजन व व्हेटीलिटरच्या सुविधा आहेत. असे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी सांगितले. 

पठारे म्हणाले, “सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून प्रशासनामार्फत जनजागृती कार्यक्रम पुन्हा सुरु केला जाईल. वेळप्रसंगी नियमांचे अमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची हि मदत घेवू.” 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT