Corona-patient 
पुणे

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात येत्या 31 ऑगस्टपर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एक लाख 60 हजारांवर जाईल. त्यापैकी 62 हजार 268 ॲक्टिव्ह रुग्ण असतील, असा आरोग्य विभागाचा अंदाज असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्याच्या तुलनेत पुणे शहरात हे प्रमाण सुमारे साठ टक्के आहे. शहरात सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुमारे 27 हजार आहे. ही संख्या ऑगस्ट अखेरपर्यंत 36 ते 38 हजारपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

राव म्हणाले, शहरात कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्युदर यामध्ये घट होत आहे. एकूण होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या 21 टक्क्यांपर्यंत पोचली असली तरी रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे जम्बो रुग्णालयाची आवश्यकता भासणार आहे. 30 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत 825 बेड्स वाढविण्यात आले आहेत. येत्या दहा-बारा दिवसांत आणखी सुमारे आठशे वाढविण्याचे नियोजन आहे. तसेच, जम्बो हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर आणखी एक हजार सहाशे बेड्स उपलब्ध होतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा, सांगली, सोलापूरमध्येही जम्बो हॉस्पिटल ; राज्य सरकारला प्रस्ताव
पुणे विभागातील सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातही जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत वैद्यकीय आणि तांत्रिक पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या जिल्ह्यातही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे. याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT