The number of corona patients in Wadgaon Sheri Kharadi Viman Nagar and Lohegaon areas of Pune is increasing rapidly
The number of corona patients in Wadgaon Sheri Kharadi Viman Nagar and Lohegaon areas of Pune is increasing rapidly 
पुणे

पुण्यातील 'या' भागातील कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय

अन्वर मोमीन

वडगाव शेरी(पुणे) : वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, लोहगाव भागातील कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ती 1224 वर जाऊन पोहोचली आहे. यात कालपर्यंत तेवीस जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत चारशे एकोणचाळीस रूग्ण पुर्ण बरे झाले आहेत. या भागात ऑक्सिजन बेडचाही तुटवडा जाणवत आहे. वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन नंतरही नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार असून प्रशासनालाही नियोजनाचा फेरआढावा घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या मानाने दाट झोपडपट्टीचा भाग असूनही शेजारील येरवडा क्षेत्रिय कार्यालयाने कोरोनाला बऱ्यापैकी रोखण्यात यश मिळवले आहे. वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालाया अंतर्गत चार प्रभागातील रुग्णांचा आकडा 1224 असून त्यात 726 लोकांवर रूग्णालयात तर चोवीस रूग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. तेवीस रूग्ण आतापर्यंत मयत झाले आहेत.

विमाननगर, सोमनाथनगर प्रभाग क्रमांक तीनमध्ये रूग्णसंख्या 313 असून 166 रूग्ण बरे झाले आहेत तर 138 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रभागात येणाऱ्या येरवड्यातील गांधीनगर व जयप्रकाशनगर येथे सुरवातीला कोरोनाचा मोठा फैलाव झाला होता. तेथे सव्वाशे रूग्ण आतापर्यंत आढळले. त्यातील आता फक्त चौदा जण उपचार घेत आहेत. तर एकशे पाच रूग्ण बरे झाले आहेत. गांधीनगर व जयप्रकाशनगरने कोरोनाला रोखण्यात यश मिळवले आहे. 

विमाननगर प्रभगातील बर्माशेल कॉलनीत चौदा रूग्ण, यमुनानगर, सम्राट चौक  परिसरात चौदा रूग्णांवर उपचार सरू आहेत. विमाननगरमधील उच्चभ्रु परिसरात सुरवातीला रोखण्यात आलेला कोरोना आता फैलाऊ लागला असून मिथीलामध्ये सहा, लुंकड आंगण, गोल्डकॉस्ट, क्विन्सलँड, गार्डन, अॅमेझॉन सोसायटीमध्ये प्रत्येकी एका रूग्णावर उपचार सुरू आहेत.
  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खराडी प्रभाग इतर तीन प्रभागांच्या तुलनेत रूग्णसंख्येत पुढे आहे. येथे रूग्णसंख्या 392 वर पोहोचली आहे. त्यात 136 रग्ण बरे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 248 रूग्णांवर उपचार सूरू आहेत. हेलर्स होममध्ये सहा, सोमनाथमळा येथे सहा, चंदननगर पाण्याची टाकीजवळ सहा, यशवंतनगर सहा, गणेशनगरमध्ये बारा, संघर्ष चौक सहा, बोराटे वस्ती सोळा, बीडीकामगारमधील सात रूग्णांचा प्रामुख्याने सामावेश असून त्यांच्यावर उपचार सूरू  आहेत. या भागातील भाजी बाजार व बाजापेठमध्ये संपुर्ण नगर रस्ता परिसरातील नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे खराडीत अधिक वेगाने फैलाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वडगाव शेरी प्रभाग क्रमांक पाच मध्ये रुग्णसंख्या 337 वर पोहोचली असून त्यातील 100 लोक बरे झाले आहेत. तर सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 231 रूग्णांवर उपचार सूरू आहेत. सैनिकवाडी, सेंट जोसेफ कॉलनी, साईनाथनगर, पोलिस कॉलनी, गणेशनगर, ऐश्वर्या रेसिडेन्सी, वडगाव शेरी येथे तुलनेत अधिक संसर्ग वाढला आहे.  लोहगाव प्रभाग क्रमांक 42मध्ये रूग्णसंख्या 170 असून त्यातील 37 रूग्ण बरे तर 133 रूग्णांवर उपचार सरू आहेत. येथील संतनगरमध्ये 19, साठेवस्तीत दहा, कोपरआळी सात, लोहगाव परिसरातील तेवीस आणि इतर भागातील रूग्णांवर उपचार सरू आहेत.

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा ; पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

याविषयी वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश बनकर म्हणाले, ''कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी टेस्टींग वाढवले आहेत. तसेच विमाननगर भागात उपचार व विलगीकरणासाठी 3200 बेडची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास स्थानिक आरोग्य निरीक्षकाची मदत घेऊन तपासणी करून उपचार करून घ्यावेत. पालिका प्रशासन कोरोनालाल रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT