chikungunya 
पुणे

पुणे शहरातील चिकनगुनियाचे रुग्ण घटले

पावसाने उघडीप दिल्याने शहरात चिकनगुनिया या किटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये याचे ८० रुग्ण होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसाने उघडीप दिल्याने शहरात चिकनगुनिया या किटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये याचे ८० रुग्ण होते. तर ऑक्टोबरमध्ये ही रुग्णसंख्या ३८ झाली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

चिकनगुनियाच्या रुग्णांचा आजार बरा झाला तरीही त्यातून काहीजणांना येणारी सांधेदुखी वेदनादायक असते. रुग्ण बरा झाला तरीही पुढील दोन ते तीन महिने सांधे दुखतात. त्यामुळे आपल्या परिसरातील डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. स्वच्छ पाण्यावर झालेल्या पैदाशीमधून हा आजार पसरतो. पावसाने आता उघडीप दिल्याने डासोत्पत्तीची ठिकाणे कमी झाली आहेत. त्याचा थेट परिणाम आता चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या कमी होण्यात झाला असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. तर पुण्यात गेल्या अकरा महिन्यांमध्ये २१८ चिकनगुनियाचे रुग्ण ढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

असा होतो संसर्ग...

चिकनगुनिया हा अरबो या प्रकारच्या विषाणूंच्या प्रादुर्भावाने होणारा आजार आहे. एडिस इजिप्ती या डासाच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होतो. या डासाची मादी चावल्याने हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.

ही आहे निदान पद्धत...

पुण्यात कोरोनाचा उद्रेकदेखील होत आहे. चिकनगुनियाची आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सुरुवातीला कोरोना निदानाची प्रयोगशाळा चाचणी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर टायफॉईड, डेंगी, चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारांची चाचणी करण्यात येते.

लक्षणे...

  • ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे

घ्यावयाची काळजी...

  • पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून रिकामी करा. योग्य पद्धतीने झाकून ठेवा.

  • घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा.

  • निरुपयोगी व टाकाऊ वस्तू छतावर आणि परिसरात ठेवू नका.

  • शक्यतो पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT