corona update google
पुणे

Corona Update : पुण्यात तिप्पटीने कोरोनामुक्त

पुणे जिल्ह्यातही कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात मंगळवारी दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत तिप्पटीने कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आज एक हजार २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट, दोन हजार ८९२ कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी नवीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली होती आणि चौपटीहून अधिक कोरोनामुक्त झाले होते. यावरुन पुणे शहरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. (number of corona patients Recovered on Tuesday are three times more than the number of new corona patients pune)

पिंपरी चिंचवडमध्ये आज ६०५ नवे रुग्ण सापडले असून दोन हजार ९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एक हजार ७३५ नवे रुग्ण आढळून आले असून एक हजार ४२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नगरपालिका हद्दीत ३१९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६१ नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दिवसभरात तीन हजार ७४१ नवे रुग्ण सापडले असून सात हजार ३५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना आकडेवारीतसुद्धा नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण दुप्पटीच्या जवळपास आहे.

जिल्ह्यात आज १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील ४६ जण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ४०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७, नगरपालिका हद्दीत तीन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : फलटणमध्ये विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT