पुणे

रुग्णांच्या संख्येत पाचपटीने वाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे - डोकं दुखतंय, ताप आलाय, सर्दीदेखील आहे, अशा आरोग्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या पाचपटीने वाढल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. शहरात डेंगी या कीटकजन्य आणि स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉक्‍टरांनी केले आहे. 

सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी असलेले रुग्ण घरोघरी दिसत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे दिवसाचा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असे विषम वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. तसेच वातावरणात आर्द्रतादेखील आहे. विषाणूंच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक असते. श्‍वसनमार्गाला संसर्ग करणाऱ्या विषाणूंचे प्रमाण यात अधिक असते. त्यामुळे याची सुरवात सर्दीने होते. त्यानंतर ताप येतो. तीन ते पाच दिवस ताप उतरत नाही. त्यानंतर घसा दुखून खोकला येतो. या आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी रुग्णाला आठ ते पंधरा दिवस लागतात. पुण्यात घरोघरी अशा रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ""श्‍वसनमार्गातील विषाणूंचा संसर्ग खोकण्यातून, थुंकण्यातून होतो. गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी पुणेकर रस्त्यांवर गर्दी करतात. त्यातून या विषाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे याची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी गर्दीत जाऊ नये. याच्या उपचारांसाठी प्रती जैविकांची फारशी गरज नसते; पण पुण्यात सध्या स्वाइन फ्लू आणि डेंगी या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णांनी वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पाहिजे.'' 

डॉ. राहुल कदम म्हणाले, ""ताप, सर्दी, खोकल्यामुळे रुग्णाला जेवण जात नाही; पण त्यातून अशक्तपणा येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळांनी रुग्णांना घरातील अन्नपदार्थ खाण्यास द्यावे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT