covid.jpg 
पुणे

पुण्यातील "या" परिसरातील रुग्णसंख्या वाढतेय वेगाने; नागरिकांनी दक्षता घ्यावी!

सकाळवृत्तसेवा

औंध : औंध, बोपोडी, पाषाण,  सुतारवाडी, सूसरस्ता, बाणेर या परिसरातील रुग्णसंख्येने आज अखेर एक हजाराचा आकडा पार केला आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मात्र कोरोना रुग्णांची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत असले तरी सोसायटीबहूल परिसरात मात्र रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कालपर्यंत (रविवार ता. १९ जुलै) घेतल्या गेलेल्या चाचण्यांमधून आजपर्यंत एकूण  १०३४ रुग्ण आढळले असून साडे सातशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर  यातील बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोनशे बासष्ट जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रीन झोनमध्ये असलेल्या या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत परिसरातील रुग्ण संख्या  झपाट्याने वाढून  आकडा हजाराच्या पार गेल्याने परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करत खबरदारीने वागण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक गर्दी टाळून मास्क, सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर ठेवून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.प्रभाग क्रमांक आठ (औंध बोपोडी) मध्ये एकूण सातशे पंचवीस रुग्णआढळले आहेत यापैकी सहाशे अठरा जणांना डिस्चार्ज दिला आहे व सोळा जणांचा मृत्यू झाला आहे.तर एक्क्याण्णव जणांवर उपचार सुरू आहेत. तर प्रभाग क्रमांक नऊ (बाणेर बालेवाडी पाषाण) परिसरातील रुग्ण संख्या कमी असली तरी नंतरच्या काळात  या प्रभागात झपाट्याने वाढ होत आहे. येथे आजपर्यंत एकूण तिनशे नऊ रुग्ण आढळले आहेत यातील एकशे बत्तीस जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकशे एकाहत्तरजणांवर उपचार सुरू आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

आठ व नऊ या दोन प्रभागाच्या तुलनेत प्रभाग आठ मध्ये झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचा भाग येत असल्याने बोपोडीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला होता परंतु या भागातील रुग्ण संख्या आता ब-यापैकी आटोक्यात आली आहे. यामध्ये सर्व्हे क्रमांक २४,२५,भोईटे वस्ती, नाईक चाळ, बोपोडी गावठाणासह परिसरातील  रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे तर सोसाट्यांतही रुग्ण आटोक्यात येत असल्याची नोंद आहे.

औंध गावठाण, डॉ.आंबेडकर वसाहत येथेही रुग्ण सापडला नाही परंतु औंध रस्ता परिसरात दोन रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांत या दाट लोकवस्तीच्या परिसरात होणारी रुग्णांची वाढ रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर प्रभाग क्रमांक आठमधील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, चव्हाण नगर व परिसरातील सोसायट्यांमध्ये काल एकूण पंधरा रुग्ण सापडल्याची नोंद आहे.या परिस्थितीत क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कोरोनाच्या  संक्रमणास आळा घालण्यासाठी   नागरीकांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

बोपोडीतील काही भागात कोरोनावर मात करण्यात काही अंशी यश मिळाले असले तरीही कोरोना विरुद्ध लढा सुरुच राहिल. या दाट लोकवस्तीत कोरोनावर मात करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्यासह स्थानिक नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर बाणेर, बालेवाडी, पाषाण भागातील कोरोना संक्रमण रोखण्यात काही दिवसातच यश येईल.-जयदीप पवार, सहायक आयुक्त, औंध क्षेत्रिय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT