hadapsar. 
पुणे

हडपसरमध्ये नर्स आणि परमेडिअकॅल स्टाफचे प्रशिक्षण शिबिर

सकाळवृत्तसेवा

हडपसर - अससोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे आणि इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थिशियालॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्दयमाने हडपसरमधील हॉस्पिटलच्या नर्स आणि परमेडिअकॅल स्टाफ यांचे हृदय सूरु करण्यासाठी लागणारे प्रयत्न याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत 80 जणांनी सहभाग घेतला. जागतिक वल्ड हार्ट रिस्टार्ट दिनानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

अससोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट चे उपाध्यक्ष म्हणाले, अशा प्रकारच्या लाईफ सेव्हींग जीवणावश्यक गोष्टींचा शाळेत मुलाच्या अभ्यासक्रमात ही समावेश करावा. तर  सामान्य नागरिक, दुकानदार, ड्रायव्हर इ. सगळ्यांनी या या प्रकारच्या शिबाराचा फायदा घ्यावा. जेणे करून आपल्या व इतरांच्या नातेवाईक यांना आपण प्रथमोपचार देऊन त्यांचे प्राण वाचविता येतील, असे मत डॉ. नागनाथ मस्तुद यांनी व्यक्त केले. 

कार्यशाळेसाठी डॉ. वंदना नंदे, डॉ. संजय लडकत, डॉ. नागनाथ मस्तुद, डॅा. मोहन पाठक आणि इतर भुलतज्ञा डॉक्टरांनी मदत केली. या कार्यक्रमा दरम्यान अससोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. दिलीप माने उपाध्यक्ष डॉ. हनुमंत साळे, सचिव डॉ. अनुराधा जाधव, सहसचिव डॉ. चेतन म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. विजय पवार, डॉ. साधना धर्माधिकारी, डॉ. अभय महिंद्रे, डॉ. रोशनी कावळे, डॉ दीपा पाठक, डॉ अमर शिंदे उपस्थित होते. या कार्यशाळेस नोबेल रूग्णालयाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॅा. वंदना नंदे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.अनुराधा जाधव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT