Nurturing Self-reliant Women with Novel Initiatives for women business startup Sakal
पुणे

Pune News : महिला उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी ‘नवनी’चे पाठबळ

‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अनोख्या कल्पनेवर सुरू केलेल्या महिलांच्या व्यवसायाला पाठबळ मिळावे. व्यवसाय वाढीसाठी त्यांना योग्य मार्गदर्शक लाभावे, या उद्देशाने ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड’च्‍यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नर्चरिंग आत्मनिर्भर वूमन विथ नोव्हल इनिशिएटिव्ह (नवनी) या उपक्रमाची सुरवात रविवारी (ता. २७) करण्यात आली.

‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, ‘एपेटाइट फूड्स ’च्या संस्थापिका सोनाली कोचरेकर, क्लबचे अध्यक्ष सुधीर बापट, सचिव वैशाली देव, ‘घे भरारी’च्या निलम एदलाबादकर,

क्लबच्या व्यावसायिक सेवा विभागाचे संचालक हर्षवर्धन भावे, उपक्रमाचे अध्यक्ष अविनाश जोग आणि ब्रँड ॲम्बेसिडर मीनल ठिपसे यावेळी उपस्थित होत्या. उपक्रमात सहभागी झालेल्या महिला उद्योजकांची आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सल्लागारांची यावेळी ओळख करून देण्यात आली.

कोचरेकर म्हणाल्या, ‘‘नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हे माझ्यासह अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना धोका पत्करल्यासारखे वाटते. मात्र जर व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन केले आणि उत्पादनांचे चांगले मार्केटिंग जमले तर नक्की व्यवसाय वृद्धी होते. व्यवसायाच्या उन्नतीसाठी पायाभूत सुविधांसह चांगल्या माणसांत देखील गुंतवणूक केली पाहिजे.

कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायाला झटका बसला, मात्र माझा व्यवसाय त्याच काळात वाढला. ग्रामीण भागातील महिलांमध्ये देखील अनेक कौशल्ये आहेत. त्यांच्या हाताला चांगली चव देखील आहे. त्यांना जर चांगली संधी मिळाली तर त्या देखील मोठ्या उद्योजक होवू शकता,’’ असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंजू फडके म्हणाल्या, ‘‘जग बदलत असून आता व्यवसायाकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी केवळ नोकरी करण्याला प्राधान्य असायचे. त्यातही सरकारी खाते, शाळा-कॉलेज आणि बँकेत रुजू होण्यासाठी प्रयत्न केले जायचे. नोकरी सोडून किंवा नोकरी करीत असताना काहीतरी वेगळे करण्यासाठी मनाचे आणि विचारांचे दरवाजे उघडले पाहिजे.

त्यानंतर सरकारच्या मदतीचे दरवाजे नक्की उघडतील. व्यवसाय सुरू केल्यानंतर स्वतःचा ब्रँड तयार करावा. तसे झाले तर यश नक्की येते.’’ सूत्रसंचालन मीनल ओरपे यांनी केले. राधा गोखले यांनी आभार मानले. ‘महिलांनी आत्मनिर्भर बनावे’ असा संदेश देणारे नृत्य नेहा मुठिया आणि त्यांच्या ग्रुपने सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT