nutan marathi vidyalaya school students attked with koyata by two minor boys crime news
nutan marathi vidyalaya school students attked with koyata by two minor boys crime news  esakal
पुणे

Pune Crime News : पुण्यातील नूमविमधील विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; अल्पवयीन दोघांकडून वार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील नूतन मराठी विद्यालय या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून विद्यार्थ्याच्या हातावर कोयता ने वार करण्यात आले आहेत. हा हल्ला १७ वर्षीय दोन मुलांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ला झालेला विद्यार्थी त्याच्या मैत्रिणीशी बोलत बस स्टॉप वर बसला होता. याचा राग आल्याने दुसऱ्या एकाने त्याच्यावर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेल्या देखील विद्यार्थ्याला हा लागला आणि तो ही यात जखमी झाला.

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. पुणे शहरात 'कोयता गँग'कडून होणारे उपद्रव वाढले आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगर, टोळक्यांकडून अनेक वेळा कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.आता हा प्रकार शाळांमध्ये देखील पोहचला आहे.

शहर पोलिसांकडून अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्या तरुणांना पकडून त्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे. धायरी येथे भैरवनाथ मंदिरा जवळील भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आणि एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करणाऱ्या सराईत तीन गुंडांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून, धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT