obc leader haribhau rathod has commented on chhagan bhujbal  Sakal
पुणे

Pune News : भुजबळ यांचा ‘बळीचा बकरा’; हरिभाऊ राठोड

‘‘छगन भुजबळ यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ते उगाचच आरक्षण प्रश्नात पडले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘छगन भुजबळ यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ते उगाचच आरक्षण प्रश्नात पडले. ‘हिरो’ व्हायला गेले, पण त्यांचा ‘बळीचा बकरा’ झाला आहे. त्यांनी राजीनामा देऊन मैदानात यावे’’, अशी टिप्पणी माजी खासदार व ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली.

‘‘भुजबळ प्रत्येक निर्णय प्रक्रियेत असतात. पण नंतर ‘यू-टर्न’ घेतात’’, असेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी बारा बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशिद, बंजारा समाजाचे नेते मुर्ती राठोड उपस्थित होते.

राठोड म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास त्यातून मराठ्यांना आरक्षण देता येईल. त्यामध्ये समकक्ष जातींचे गट केल्यावर ओबीसींचा फायदाच होणार आहे. हा फॉर्म्युला सरकारने ऐकून घ्यावा. त्यातून आरक्षणाचा प्रश्न सहज सुटेल.’’

सध्या मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत, असे राठोड म्हणाले. ‘‘मनोज जरांगे-पाटील यांनी ‘लायकी’ हा शब्द मागे घेतला आहे. पण जनतेचे समाधान होत नसेल तर त्यांनी माफी मागावी’’, असेही त्यांनी नमूद केले.

हरिभाऊ राठोड म्हणाले

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे पडले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत.

- राज्य सरकारने ओबीसींची भीती बाळगू नये.

- छगन भुजबळ यांच्या चुकीच्या वक्तव्यांना आमचा पाठिंबा नाही.

- भुजबळ यांनी सभा घेऊन आणि टाळ्यांची भाषणे करून वातावरण निर्मिती केली.

- सर्वच समाजातील नेत्यांनी संयमाने भाषा वापरावी.

- प्रकाश आंबेडकर यांची भाषा कठीण आहे, ते काय बोलतात ते कळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT