पुणे

पाटसमध्ये ओबीसी मोर्चेकऱ्यांना रोखले

CD

कानगाव/पाटस, ता. १ : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या ‘महा एल्गार मोर्चा’ला पाटस (ता. दौंड) टोलनाका येथे पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाला परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर मोर्चेकरी सुमारे अडीच ते तीन तास टोलनाका परिसरात खोळंबले. हाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी पुणे- सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
पाटस टोलनाका येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विविध जिल्ह्यांतून आलेले मोर्चेकरी दाखल झाले. मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे हाके यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. मोठ्या संख्येने मोर्चेकरी एकत्र आल्याने टोलनाका परिसरात गर्दी झाली. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ओबीसी समाजबांधवांना पोलिसांकडून त्यांच्या ठिकाणावर अडवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप हाके यांनी केला. तसेच, अडवून ठेवण्यात आलेली मोर्चेकऱ्यांची वाहने सोडण्यात यावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. अडविलेल्या वाहनांना पुढे जाण्याची परवानगी मिळेपर्यंत रस्ता मोकळा करणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे काही काळ पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाटस टोलनाका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पाटस येथे भेट दिली. त्यांनी मोर्चेकरी व आंदोलकांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. अंदाजे अडीच ते तीन तासांच्या ठिय्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास आंदोलकांनी महामार्गावरील रस्ता खुला केला. त्यानंतर मोर्चेकरी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. रस्ता खुला झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.


पाटस (ता. दौंड) : टोल नाका येथे भर रस्त्यावर ठिय्या मांडून म्हणून बसलेले मोर्चेकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

माजी माओवादी नेता भूपतीवर मोठी जबाबदारी; विद्यापीठात समन्वयक म्हणून करणार मार्गदर्शन

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

Ranji Trophy: शार्दुल ठाकूरला कर्णधारपदावरून काढलं, मग नवा कॅप्टन कोण? मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT