पुणे

कोरोना रुग्णांसाठी लठ्ठपणा घातक

सकाळवृत्तसेवा

पुणे - शारीरिक स्थूलता किंवा लठ्ठपणामुळे व्यक्तीला एकापेक्षा अधिक जीवनशैलीशी निगडित आजार असतात. तसेच तिला श्‍वसनालाही त्रास होतो. पर्यायाने अशांना कोरोनाचा धोका अधिक वाढतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास अत्यवस्थ रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिका, युरोप, ब्राझील येथील संशोधनानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) शास्त्रज्ञांनी भारतातही हा धोका अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. स्थूलता किंवा लठ्ठपणा असलेल्या रुग्णांकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच त्यांना वेळेत आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे डॉ. राखी यादव, डॉ. संदीप अगरवाल आणि डॉ. अर्चना सिंह यांनी शोधनिबंधात म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थूलतेचा परिणाम
ओटीपोटाची चरबी छातीच्या पोकळीत ढकलली जाते. पर्यायाने फुप्फुसांवर ताण येतो आणि नलिकेतील वायू प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. तसेच ऑक्‍सिजनेशनसाठी येणाऱ्या रक्ताचे प्रमाणही वाढते. स्थूलतेमुळे व्यक्तीतील रोगप्रतिकारशक्तीही कमी होते. चरबीमुळे विविध अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झालेला असतो. पर्यायाने त्यांच्यामध्ये जीवनशैली विकारांचे (उच्च रक्तदाब, मधुमेह आदी) प्रमाणही अधिक असते. कोरोनाच्या उपचारावेळी अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना क्‍लिष्टता वाढत जाते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपाययोजना

  •  स्थूल रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था हवी
  •  त्यांच्यासाठी अतिरिक्त ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर हवे
  •  अशा लोकांनी आहाराबरोबरच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी  डॉक्‍टरांच्या सल्ल्याने व्यायाम  करावा
  •  लक्षणे जाणवल्यास त्वरित 
  •    चाचणी आणि डॉक्‍टरांचा सल्ला 
  •    घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT