Pankaja Munde 
पुणे

Vidhan Sabha 2019 : चिंचवडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा रविवार असून, सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला.

पंकजा मुंडे आज चिंचवडचे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी चिंचवड येथील थेरगावमध्ये आल्या होत्या. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी सभेत गोंधळ घातला. शास्ती कर, हक्कांचे घर हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणी नाही आले, मात्र मत मागण्यांसाठी चिंचवडमध्ये आले, असे म्हणत उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातला. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी या तिघांना तातडीने बाहेर काढले.

विरोधकांनी माझ्या सभेमध्ये असे लोक पाठविले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे लोक पाठविल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे बहुसंख्य प्रश्न गेल्या पाच वर्षात मार्गी लागले आहेत. जे प्रश्न मार्गी लागले नाहीत ते सोडवण्यासाठी आगामी काळात शहराची पालक म्हणून काम करेन, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT