obscene hints insults stalking women expressed their grievances to Rupali Chakankar to take strict action crime women safety 
पुणे

Rupali Chakankar : अश्लील इशारे,शिव्या,पाठलाग, वाईट नजरेने पाहणे महिलांनी रुपाली चाकणकरांकडे मांडल्या व्यथा

समाजकंटकांच्या त्रासाने वैतागलेल्या महिलांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापुढे मांडल्या व्यथा; निवेदन देत कठोर कारवाई करण्याची मागणी

निलेश बोरुडे

किरकटवाडी: 'रात्री तर आम्ही घराबाहेर पडूच शकत नाहीत परंतु दिवसाही भाजी, किराणा सामान, मुलांना शाळेत सोडणे किंवा इतर काही कामासाठीही घराबाहेर निघताना आम्हाला भिती वाटते', असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील समाजकंटकांच्या त्रासाने वैतागलेल्या भैरवनाथ नगरच्या महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.

यावेळी तब्बल शंभर पेक्षा जास्त महिलांच्या सह्यांचे निवेदन रुपाली चाकणकर यांना देत महिलांनी या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'नशेत असलेले हे टवाळखोर रस्त्यावर जागोजागी टोळके करुन बसलेले असतात. महिला,मुलींना पाहून अत्यंत घाणेरडे इशारे करतात, शिव्या देतात, पाठलाग करतात.

काही बोलायला गेलो तर रस्ता तुमच्या बापाचा आहे का म्हणतात. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, आम्हाला कोणीच काही करु शकत नाही म्हणून धमकी देतात. आमचं जगणं मुश्कील झालं आहे. दिवसाही घराबाहेर पडण्याची भीती वाटते. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे',

अशा संतप्त शब्दांत भैरवनाथ नगरच्या महिलांनी किरकटवाडी येथील आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या व लेखी निवेदन देत पोलिसांमार्फत या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी उपस्थित असलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांना चाकणकर यांनी तातडीने कारवाई करुन महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"हवेली पोलिसांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राज्य महिला आयोगाच्या वतीने याबाबत पत्रही देण्यात येणार आहे. उद्यापासून येथील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होईल."

रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.

" संबंधित परिसरात नियमित गस्त ठेवण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठी या टवाळखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT