October-Heat
October-Heat 
पुणे

‘ऑक्‍टोबर हीट’चा कहर

सकाळवृत्तसेवा

शहरात पंधरा वर्षांतील सर्वाधिक तापमानाचा अनुभव
पुणे - दिवसभर उकाडा, दुपारी तर चटका देणारे ऊन आणि घामाच्या धारा... असा अनुभव तुम्ही आता घेताय ना! आपण त्याला सर्वसाधारणपणे ‘ऑक्‍टोबर हीट’ म्हणतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की पुणेकर गेल्या पंधरा वर्षांमधील सर्वाधिक उष्ण ऑक्‍टोबर अनुभवत आहेत. यंदा ११ ऑक्‍टोबरला शिवाजीनगर येथे कमाल तापमानाचा पारा ३५.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यानंतरही कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा जास्त उसळी मारली आहे. 

शिवाजीनगर येथे ऑक्‍टोबर २००२ मध्ये ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे ऑक्‍टोबर २००३ मध्ये तापमानाचा पारा ३५.१ अंश सेल्सिअसपर्यंत उसळला होता. पुण्याचे ऑक्‍टोबरमधील सरासरी कमाल तापमान ३१.२ अंश सेल्सिअस असले, तरीही गेल्या दहा वर्षांमध्ये ऑक्‍टोबरचे तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले. त्या तुलनेत यंदाच्या ‘ऑक्‍टोबर हीट’मध्ये पुणेकर भाजून निघत आहेत. शिवाजीनगरच्या तुलनेत लोहगावमधील उष्णता अधिक असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

दिवसभर उन्हाचा चटका असला, तरीही रात्री काही प्रमाणात हवेत गारवा असतो. यंदा मात्र किमान तापमान सरासरीच्या बरोबर तसेच, काही दिवसांमध्ये सरासरीपेक्षा जास्त नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. शहरात गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पावसाच्या काही सरी पडल्या होत्या. १ ऑक्‍टोबर २०१७ रोजी सर्वाधिक कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. याबाबत भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘पुण्यातील तापमानात झालेली वाढ ही नैसर्गिक आहे. यंदा ऑक्‍टोबरमध्ये पाऊस पडला नाही. तसेच, सध्या आकाशात ढगदेखील नाहीत. यामुळे तापमानात वाढ झाली आहे.’’

असे का होतेय?
    पुण्यात ऑक्‍टोबरमध्ये पावसाच्या सरी पडलेल्या नाहीत. 
    शहर आणि परिसरातील हवामान कोरडे आहे. 
    हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाली. 
    आकाश निरभ्र असल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे.

शहरातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे; पण त्याचवेळी किमान तापमान सरासरीइतके आणि काही दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत अंशतः कमी झाले आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री हवेत गारवा जाणवत आहे.
- डॉ. ए. के. श्रीवास्तव, शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT