पुणे

‘ऑक्टोबर हीट’ने राज्य होरपळले

CD

‘ऑक्टोबर हीट’ने
राज्य होरपळले

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : तीव्र ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा मॉन्सूनच्या पावसात मोठी तूट राहिल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत असून, ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे. दिवसा तीव्र उन्हासह उकाडाही वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसातील अनियमितता आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तापमानातील ही वाढ शेतीसाठी चिंतेची ठरत आहे.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ७ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १ ते ५ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात २ ते ५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ दिसून आली आहे. त्यातच किमान तापमानातदेखील वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही उकाडा कायम राहत आहे.
सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणात उष्ण व दमट हवामान होते. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या मुंबई केंद्रातर्फे सांगण्यात आले.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) :
रत्नागिरी ३८.३, अमरावती ३८.२, अकोला ३८.१, ‎सांताक्रूझ ३८, यवतमाळ ३७.७, सोलापूर ३७.६, जळगाव ३७.१.
---

रविवारी (ता. ११) राज्यात नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मध्य महाराष्ट्र
‎‎धुळे---३६
जळगाव---३७.१
जेऊर---३६
निफाड---३६.१
‎सोलापूर---३७.६

---
कोकण
‎सांताक्रूझ---३८
डहाणू---३६.३
रत्नागिरी---३८.३
----
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर---३६.५
धाराशिव---३६.१
---
विदर्भ
अकोला---३८.१
अमरावती---३८.२
बुलडाणा---३६.२
चंद्रपूर---३६
‎वर्धा---३६.२
‎यवतमाळ---३७.७

फोटो आहे. (agnMax Temp for Oct 2026)
ऑक्टोबर महिन्यातील कमाल तापमानाचा अंदाज दर्शविणारा नकाशा (सौजन्य : हवामान विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT