पुणे

पावसाच्या सरींऐवजी घामाच्या धारा

CD

पिंपरी, ता. १८ ः पावसाने दडी मारल्यामुळे शहरातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी (ता. १८) पिंपरी चिंचवड शहरात कमाल तापमान ३५ अंशांवर गेले होते. शहरात दुपारी उन्हाच्या झळा लागत असून, घामाच्या धारा येत आहेत. उन्हाचा चटका वाढल्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा जाणवत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात काही दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. सप्टेंबर महिना कोरडा गेला होता. आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवडाही कोरडा गेला आहे. त्यामुळे शहरात कमाल तापमानात वाढ होत असून, मागील सात दिवसांत किमान तापमानात २ आणि कमाल तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे. रविवारी शहरात किमान २३.८ अंश आणि कमाल ३५.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम
शहरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. मात्र, कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. हवामान बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. हवामान बदलामुळे नागरिकांना विविध आरोग्यांच्या समस्या येत आहेत. नागरिकांनी योग्य आहार, चार ते पाच लीटर पाणी आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वार - किमान - कमाल तापमान
गुरुवार - २२.९ - ३४.४
शुक्रवार - २३ - ३४.२
शनिवार - २३.२ - ३५
रविवार - २३.८ - ३५.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर आणि बाबासाहेब देशमुख महायुतीच्या पाठिशी? जयकुमार गोरेंचा दावा

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT