पुणे

ओडिशात समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटनावर निर्बंध

CD

ओडिशात पर्यटनावर निर्बंध
संभाव्य चक्रीवादळामुळे खबरदारी
भुवनेश्वर, ता. १८ (पीटीआय): बंगालच्या उपसागरात समुद्र खवळल्याने आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर शुक्रवारी (ता. २०) ‘अक्वन’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन आणि मनोरंजनात्मक उपक्रमांवर निर्बंध घातले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, तीव्र चक्रीवादळाचा ताशी कमाल १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्यांचे झोत ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. २० नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास नेल्लोर आणि विशाखापट्टणदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला हे वादळ धडकण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे ओडिशातही गुरुवारी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. १८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २१ नोव्हेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशाचे विशेष मदत आयुक्त राजेश पी. पाटील यांनी पर्यटन विभागाच्या आयुक्त तथा सचिवांना पत्र लिहून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटक, पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खवळलेला समुद्र, वादळी वारे, अतिवृष्टी आणि किनारपट्टीवरील पाणी शिरण्याच्या धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. धोकादायक किनारपट्टीवरील पर्यटन आणि मनोरंजनात्मक उपक्रम तातडीने बंद करण्याच्या सूचना पर्यटन अधिकारी, पर्यटन व्यावसायिक, हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांना देण्यास सांगण्यात आले. नौकाविहार, जलक्रीडा, समुद्रातील सफरी आणि अन्य सागरी पर्यटन उपक्रमही परिस्थिती सुरक्षित घोषित होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. असुरक्षित किनारे, जेट्टी आणि किनारपट्टीवरील निरीक्षण स्थळांवर नागरिकांना जाण्यास मनाई करण्यासही सांगण्यात आले आहे. हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांना सतर्क करावे, बाहेरील सहली टाळण्यास सांगावे तसेच स्थलांतर किंवा सुरक्षित निवाऱ्याबाबतच्या सूचनांचे पालन करावे, असे पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Compensation Latest News : पाच हजारांच्या मदतीची घोषणा हवेतच, बहुतांश दुष्का ळग्रस्त शेतकरी वंचित; शेतकऱ्यांचा सवाल, पैसे मिळणार कधी?

ICC ODI Rankings : रोहित शर्माला धक्का, आयसीसीच्या घोषणेने सर्व खडबडून जागे झाले... नेमके असे काय घडले?

Solapur Sugarcane Price: ऊसाला साडेतीन हजारांची पहिली उचल मिळणार का? राजू शेट्टींचा इशारा; गुरुवारी सोलापुरात निर्णायक बैठक

Punjab Lottery Winner : १५ वर्षे कुटुंबापासून लपवून ठेवली 'ती' सवय; अवघ्या ५०० रुपयांच्या तिकिटाने ट्रक चालक एका रात्रीत झाला १२ कोटींचा मालक!

Latest Marathi News Live Update : तीन लाखांहून अधिक शेतकरी पाच हजारांच्या मदतीपासून वंचित

SCROLL FOR NEXT