Officer Suspense to withhold information sakal
पुणे

Pune Porsche Accident : मोटारीबाबत आरटीओची भूमिका संशयास्पद; अधिकाऱ्याची ‘सरकारी’ उत्तरे; माहिती दडविण्यासाठी उठाठेव

‘पोर्शेकार’ अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होत असताना पुणे आरटीओ मात्र याबाबत काही बोलायला तयार नाही.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात बिनदिक्कतपणे फिरणाऱ्या आणि दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या ‘पोर्शे’ मोटारीच्या मालकाबाबत आरटीओची भूमिका संशयास्पद आहे.

‘पोर्शेकार’ अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होत असताना पुणे आरटीओ मात्र याबाबत काही बोलायला तयार नाही. कारची नोंदणी रद्दबाबत पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजीव भोर यांनी सावध पवित्रा घेत ‘मी कार्यालयात नाही, नोटिशीला उत्तर आले की नाही?

याबाबत काही माहिती नाही’ अशी ‘सरकारी’ उत्तरे दिली, तर दुसरीकडे दोन वेळा अपघातग्रस्त वाहनाची पाहणी व तपासणी करूनदेखील या अपघाताबाबतची प्राथमिक माहिती देखील दडविण्यात येत आहे. त्यामुळे आरटीओच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. कल्याणीनगर रस्ते अपघाताला आठ दिवस पूर्ण झाले आहेत.

या दरम्यान पुणे आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रेय गाढवे, विनोद जाधव व आशिष पराशर या तिघांनी दोन वेळा अपघातग्रस्त मोटारीची तपासणी केली. दोन वेळा तपासणी करूनदेखील पुण्याचे आरटीओ अधिकारी संजीव भोर याबाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत.

आरटीओ दोन महिने झोपले होते का ?

बेंगळुरू येथे तात्पुरती वाहन नोंदणी करून पुण्यात मोटार दाखल झाली. १८ मार्चला पुणे आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, रस्ता कर व अन्य शुल्क न भरल्याने वाहनाची नोंदणी झाली नाही. त्यानंतर २ महिने ही कार शहराच्या विविध भागांत फिरत होती. त्यावेळी आरटीओचे वायुवेग पथक झोपले होते का ? त्यांना कुठेच ही कार आढळून आली का नाही? असा प्रश्न पुणेकर उपस्थित करीत आहेत.

असा झाला संवाद

प्रतिनिधी : सर, पोर्शेकारची नोंदणी रद्द करण्याबाबत काही कारवाई झाली का ?

संजीव भोर : नाही.

प्रतिनिधी : संबंधित कारच्या मालकाला आपण नोटीस दिली होती, त्याला उत्तर मिळाले का ?

संजीव भोर : मी कार्यालयात नाही, नोटिशीला उत्तर आले की नाही हे मला माहीत नाही.

प्रतिनिधी : सर, नोटिशीला प्रतिसाद मिळाला नसेल पुढची भूमिका कोणती असेल.

संजीव भोर : कार्यालयात गेल्यावर माहिती घेऊनच यावर बोलणे योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT