Bribe Case News esakal
पुणे

Bribe News : वैधमापनशास्त्र विभागातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकाकडून लाच घेतल्याप्रकरणी विभागीय सहनियंत्रकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकाकडून ३१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विभागीय सहनियंत्रकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. येरवडा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय ५५) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागातील इस्लामपूर येथील निरीक्षक यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हारोळे हा येरवडा येथील वैधमापनशास्त्र वैधमापनशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. हारोळे याने त्याच्या कार्यक्षेत्रात पडताळणी आणि मुद्रांकनासाठी प्रत्येक निरीक्षकाकडे दरमहा चार हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती.

त्यानुसार इस्लामपूर, कराडमधील दोन आणि सातारा अशा चार निरीक्षकांकडून प्रत्येकी चार हजार रुपये यानुसार १६ हजार रुपये तसेच डायमंड शुगर वर्क कंपनीच्या कामासाठी १५ हजार रुपये अशी एकूण ३१ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत इस्लामपूर येथील निरीक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली होती.

त्याची पडताळणी करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी येरवड्यातील वैधमापनशास्त्र कार्यालयात हारोळे याला लाच घेताना अटक केली. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT