Officials of MNS participate in campaign of candidates of Mahayuti in Lok Sabha Election 2024  
पुणे

Lok Sabha Election : मनसेचे नेते करणार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार; राज्यातील सर्व मतदारसंघासाठी नेमले समन्वयक

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहिर केला आहे.

मिलींद संगई

बारामती, ता. 17- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांनी दिली.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहिर केला आहे. त्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघासाठी नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.

पुण्यासाठी अमित ठाकरे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेंडगे यांची शिरुरसाठी राजेंद्र (बाबू) वागस्कर, अजय शिंदे, मावळसाठी नितीन सरदेसाई व रणजित शिरोळे, अमेय खोपकर तर बारामती, सोलापूर व माढा या मतदारसंघांसाठी दिलीप धोत्रे व अँड. सुधीर पाटसकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मनसेने केले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संबंधित पक्षाच्या पदाधिका-यांनी मनसेच्या वरील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असेही सांगण्यात आले आहे.

प्रचारात सहभागी होणार....

लवकरच मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संबंधित लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसे सहभागी होईल - अॅड.सुधीर पाटसकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT