dnd. 
पुणे

अरे वा, दौंडमधील आजी, आजोबा व नातीवर पुष्पवृष्टी

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये प्रथमच उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या आजी व नात यांच्यावर उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे व आरोग्य कर्मचारी पथकाने पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या. मात्र, दोघींना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दौंड - सिध्दटेक रस्त्यालगत वास्तव्य करणारे ८२ वर्षीय दूध विक्रेत्यांना १६ मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. १९ मे रोजी त्यांची ७५ वर्षीय पत्नी व २० वर्षीय नात यांना बाधा झाली होती. त्यापैकी ८२ वर्षीय आजोबांवर पुणे येथे, तर आजी व नातीवर दौंड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. आज (ता. २७) या तिघांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून, तिघांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. संग्राम डांगे यांनी दिली.

तसेच, दौंड शहरातील नेहरू चौक येथील नव्वद वर्षीय महिलेस २६ मे रोजी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १७ जणांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल आज आला असून, सर्व १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!
                 
दरम्यान, सांगली येथे बंदोबस्त पूर्ण करून आलेल्या राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातची एक तुकडी दौंड शहरात परतली आहे. या तुकडीमधील ८ पोलिसांचे घशातील द्रव तपासणीसाठी पुणे येथे पाठविल्याची माहिती गटाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा. वैशाली खान यांनी दिली. 

दौंड तालुक्यातील आजअखेर बाधितांची संख्या १७ झाली असून, त्यामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे १ पोलिस व १ नव्वद वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT