ओझर : शिवऋण संस्थेतील मनोरुग्णांना अखेर हलविण्यात आले sakal
पुणे

ओझर : शिवऋण संस्थेतील मनोरुग्णांना अखेर हलविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

ओझर : शिरोली बुद्रुक ता. जुन्नर येथील शिवऋण संस्थेतील सर्व ४६ मनोरुग्णांना आज सोमवार ता.१८ रोजी हलविण्यात आले. ह्या संस्थेचे चालक अक्षय बोऱ्हाडे संबंधितावर विविध प्रकरण गुन्हे दाखल असल्याने ते सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेनंतर येथील मनोरुग्णाच्या देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच या दरम्यान संस्थेतील तीन मनोरुग्णांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न झाला होता.

येथील मनोरुग्ण हलविण्याची आवश्यकता होती. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. येथील ४६ मनोरूग्णांची कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांची रवानगी येरवडा येथील रुग्णालयात खास बसने करण्यात आली. यामध्ये ३४ पुरुष व१२ महिलांचा सामावेश आहे.

जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. मच्छिंद्र भोर तसेच महसूल, पोलिस व आरोग्य या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कामी महत्वाची भूमीका बजावली. शिरोलीचे सरपंच प्रदिप थोरवे, पोलिस पाटील अमोल थोरवे, सुधीर देवणे व ग्रामस्थानी प्रशासनास सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT