Ramesh-Gaikwad
Ramesh-Gaikwad 
पुणे

आप्तांनीच टाकले कचऱ्यात

जितेंद्र मैड

पौड रस्ता - मला येथेच मरू द्या. आपल्याच लोकांनी टाकून दिलेय, तर परक्‍यांकडून आलेला दयेचा हात का घेऊ. जगाचे अनेक रंग बघितले आता कंटाळलो, ही व्यथा होती तीन दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून असलेल्या रमेश गायकवाड या ज्येष्ठ नागरिकाची.

मानस तलावानजीक असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर एक माणूस झोपलेला मी पाहत होतो. भर पावसात हा माणूस कचऱ्यात का पडला आहे, याची चौकशी केली असता समजले की या ज्येष्ठाला त्याच्या घरच्यांनी येथे सोडून पळ काढला. या गोष्टीचा मला फारच धक्का बसला. माणुसकी कचऱ्यात सडते आहे, या कल्पनेने मी पूर्ण हादरून गेलो आहे, असे सांगत होते व्यावसायिक नितीन दीक्षित. 

‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘या वडीलधाऱ्या माणसाला ज्यांनी रस्त्यावर सोडून दिले त्यांची चीड आली; पण फक्त चिडून काय उपयोग. मी त्यांना तातडीने चहा, बिस्किटे दिली. चौकशी केली तेव्हा समजले की त्यांचे नाव रमेश गायकवाड असून, ते कोल्हापूरचे आहेत. मी त्यांना माझ्या घरी चलण्याची विनंती केली; परंतु या ज्येष्ठाने नकार दिला. मी १०८ नंबरला फोन करून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आली; परंतु त्यामध्ये बसण्यासही या ज्येष्ठाने नकार दिला. मला येथेच मरू द्या, असे त्यांचे म्हणणे होते. रुग्णवाहिकेतील आरोग्य सेवकांनी खूप समजावून सांगितले तरी त्यांनी नकार दिला. 

‘आपल्याच लोकांनी टाकून दिलेय, तर परक्‍यांकडून आलेला दयेचा हात का घेऊ. जगाचे अनेक रंग बघितले आता कंटाळलो या सर्व जगाला. मला येथेच मरू द्या. रुग्णवाहिकेतील कर्मचारी कंटाळून निघून गेले. मीसुद्धा हताश होऊन घरी आलो. यासंदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आम्हाला निरोप आला की रात्री-अपरात्रीसुद्धा आमचे कर्मचारी रुग्ण घेऊन येतात; परंतु अनोळखी व्यक्ती असेल तर पोलिस मदत अपेक्षित आहे; परंतु आमचा अनुभव असा आहे की पोलिसांचे सहकार्य क्वचितच मिळते. बऱ्याचदा पोलिस नसतानाही आमचे कर्मचारी रुग्णसेवेसाठी धोका पत्करत असतात.’ 

डॉ. विनोद शहा म्हणाले, ‘वृद्धश्रमात ठेवण्याअगोरदर संबंधिताची आरोग्य तपासणी करून त्यावर त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यासाठी प्रथम या ज्येष्ठाची ससूनला आरोग्य तपासणी करणे आवश्‍यक आहे. 

आवश्‍यकतेनुसार त्यांना वृद्धाश्रमात किंवा भीक्षेकरीगृहात व्यवस्था करता येईल. यासंदर्भात काही अडचण असेल तर आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.पौड रस्त्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘त्या ज्येष्ठाला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 
तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT