MLA Sunil Tingre sakal
पुणे

Pune Wada : पेठांमधील वाड्यांना झोपडपट्टी घोषीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आमदार सुनील टिंगरे

पेठांमधील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) राबविण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पेठांमधील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) राबविण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदार सुनील टिंगरे यांनी केली.

विधानसभेत प्वाइंट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पेठांमधील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास किचकट नियमांमुळे रखडला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे वाडे झोपडपट्टी असल्याचे भासविण्यात आले. तसा अभिप्राय महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंत्यांनी ‘एसआरए’ला दिला. त्यानुसार सुमारे ७० वाड्यांचा पुनर्विकास ‘एसआरए’ म्हणून केला गेला आहे.

यामध्ये महापालिकेची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे अशी तक्रार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी एसआरएच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून ज्यांच्या ना कामांचा प्रस्ताव मान्य केलेला नाही अशा प्रकरणांना स्थगिती द्यावी अशी सूचना केली आहे. तसेच तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित केली आहे.

याप्रकरणात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे, आमदार टिंगरे यांनी विधानसभेत प्वाइंट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. शहरातील वाड्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे, पण बांधकाम व्यावसायिकाने महापालिका व एसआरएच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून वाडे हे झोपडपट्टी तर भाडेकरू हे झोपडपट्टीधारक आहेत असे भासवून मान्यता घेतात. त्यातून टीडीआर निर्माण होताना मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे याची चौकशी करून अधिकाऱ्यांवर करावी, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT