crime sakal
पुणे

ओएलएक्‍स'वरुन वृद्ध महिलेची 90 हजार रुपयांची फसवणूक

ओएलएक्‍सवरून जाहीरात केलेले जुने फर्निचर खरेदी करण्याचा बहाणा करुन सायबर गुन्हेगारांनी वृद्ध महिलेची 90 हजार रुपयांची फसवणुक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ओएलएक्‍सवरून जाहीरात केलेले जुने फर्निचर खरेदी करण्याचा बहाणा करुन सायबर गुन्हेगारांनी वृद्ध महिलेची 90 हजार रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 64 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर विकून नवीन फर्निचर घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी जुने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्‍सवर जाहिरात दिली होती. त्यावेळी अभय शर्मा नावाच्या एका व्यक्तीने त्यांची जाहिरात पाहून त्यांना फोन केला. त्यांचे जुने फर्निचर विकत घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्याने फर्निचरचे पैसे देण्यासाठी फिर्यादीस एक लिंक पाठविली. फिर्यादींनी संबंधीत लिंक उघडून त्यावर माहिती भरली.

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बॅंक खात्यातुन 89 हजार 900 रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे काढऊन घेतले. फिर्यादीच्या खात्यातुन अचानक पैसे कमी झाल्यानंतर त्यांना फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी संबंधीत प्रकरणाची चौकशी करून केल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT