Old woman jewellery Looted by Thief at Narayan Peth in pune 
पुणे

पाणी प्यायला म्हणून घरात शिरला अन् एकट्या आजीला पाहून...

सकाळवृत्तसेवा

पुणे : तहानलेल्या पाणी देणे पुण्याचे काम म्हटले जाते परंतु, तहानलेल्या पाणी द्यायची सुध्दा पुण्यात सोय नाही. ण्यातील एका आजीला तहालेल्याला पाणी देणे चांगलेच महागात पडले आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरट्याने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले. या घटनेत चोरट्याबरोबर झटापट झाल्याने वृद्ध महिला जखमी झाली. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजता नारायण पेठेत घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी 80 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शनिवारी त्यांच्या घरी एकट्याच होत्या. घराबाहेरुन आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आलेल्या व्यक्तीने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेल्या, त्यावेळी तो त्यांच्या पाठीमागे आला. चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या काढू लागला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर त्याने फिर्यादीच्या हातातील बांगड्या फोडल्या. त्यामुळे फिर्यादी या जखमी झाले. महिला बांगड्या व सोन्याचे दागिने काढून देत नसल्यामुळे त्याने जबरदस्तीने दागिने काढून घेतले. त्यानंतर तो पसार झाला.

पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!

दरम्यान, महिलेने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT