Crime news sakal
पुणे

हातचलाखी करून भामट्याने वृद्धमहिलेचे सोन्याचे दागिने चोरले

'आम्ही गरीब लोकांना धान्य, कपडे व पैसे वाटप करत आहोत, तुम्ही माझ्यासोबत चला'

डी. के. वळसे

'आम्ही गरीब लोकांना धान्य, कपडे व पैसे वाटप करत आहोत, तुम्ही माझ्यासोबत चला'

मंचर - 'आम्ही गरीब लोकांना धान्य, कपडे व पैसे वाटप करत आहोत, तुम्ही माझ्यासोबत चला' असे सांगून हातचलाखी करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे दागिने भामट्याने चोरून नेले. मंचर शहरात भरवस्तीत सदर घटना घडली आहे.

याबाबत लता सुरेश भालेराव ( वय ७२ रा. पाटीलवाडा, मंचर, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यात अश्या पद्धतीचे गुन्हे घडूनही अद्याप आरोपी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लता भालेराव या रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी मशीदी शेजारच्या गल्लीमधील अलंकार स्टोअरपासून जात होत्या.तेथे एका ३० ते ३५ वयाच्या अनोळखी व्यक्तीने लता भालेराव यांना सांगितले की 'आम्ही गरीब लोकांना धान्य, कपडे व पैसे वाटप करत आहोत, तुम्ही माझे सोबत चला' त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भालेराव सदर व्यक्तीबरोबर गेल्या. 'आजी तुम्ही तुमच्या गळयातील दागीने काढुन ठेवा' असे सांगितले. त्यानुसार भालेराव यांनी गळयातील ७२ हजार रुपये किंमतीचे दिड तोळ्याचे मंगळसुत्र व २४ हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळ्याचे डोरले काढुन स्वतःच्या हातात ठेवले. सदर व्यक्ती म्हणाली 'तुमचे मंगळसूत्र व डोरले पुडीत बांधून ठेवतो' असे सांगून हातचलाखी करून पुडी बांधून भालेराव यांच्या हातात देऊन सदर व्यक्ती निघून गेली.त्यानंतर भालेराव यांनी पुडी उघडुन पाहीली. पुडीमध्ये मंगळसुत्र व डोरले नव्हते. या प्रकरणी मंचर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT