om gym case electric current police investigation pune crime  esakal
पुणे

Pune Crime : ओपम जीम दुर्घटने प्रकणी अद्यापही दोष निश्चिती नाही...

वरिष्ठ स्तरावर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : भुसारी कॉलनी येथे खुल्या मैदानातील ओपन जीमवर बसलेला असताना भूमिगत वीज वाहिनीचा शॉक बसून २० मार्च रोजी अमोल नाकते या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणास पंधरा दिवस उलटून गेले तरी दुर्घटनेचे नेमके कारण वा दोष निश्चिती झालेली नाही.

पोलिस म्हणतात तपास चालू आहे, तर वीज मंडळाचे अधिकारी अजून अहवाल मिळाला नसल्याचे सांगत आहेत. या प्रकरणात दोष निश्चिती करुन सत्य लोकांपुढे मांडावे अशी मागणी करण्यात आली आहे.

मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, ॲड सचिन पवार, मृत तरुणाचा भाऊ प्रशांत नाकते यांनी पोलिस आयुक्त, पुणे मनपा आयुक्तांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष निश्चिती करावी अशी मागणी केली होती. माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनीही कोथरुड क्षेत्रिय कार्यालयात निवेदन देवून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, भूमीगत वीज वाहीनी ही कमितकमी तीन फुट खाली असावी असा नियम आहे. येथे या वाहीन्या सव्वा फुट खोलीवर होत्या. या वाहीन्यांना संरक्षित करण्यासाठी सिमेंट वा इतर कोणतेही दुसरे पाईप लावलेले नव्हते.

जीमचे काम करते वेळी येथून वीज वाहीन्या गेल्यात याची काळजी संबंधित ठेकेदारानेही घेतलेली नाही. त्यामुळे वीज मंडळ व जीम बसवणारा असे दोन्ही ठेकेदार तसेच या कामाची योग्य पाहणी न करता त्याला मंजुरी देणारे अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसते.

प्रशांत कनोजिया म्हणाले की, या मैदानात सकाळी आणि संध्याकाळी शेकडो नागरिक व्यायामासाठी येत असतात. ही दुर्घटना घडल्यापासून लोकांनी जीमपाशी जाणे बंद केले आहे. पोलिस, वीज मंडळ व मनपा अधिका-यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. आता या जागेचा वापर लोकांनी करायचा की नाही हे सुध्दा सांगावे. यासंदर्भात माहिती अधिकारात माह्ती मागितली आहे.

कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत पाटील म्हणाले की, यासाठी आवश्यक अहवाल मिळण्याच्या प्रतिक्षेत आम्ही आहेत. या प्रकरणात आमचा तपास सुरु आहे. मागणी वरिष्ठ अधिकारी चौकशी समिती स्थापन करुन घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. शहरात असणाऱ्या सर्व ओपन जिमची तातडीने पाहणी करून त्या वापरण्यास सुरक्षित आहेत याची खात्री करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT