National Mathematics Day sakal
पुणे

National Mathematics Day : गणित दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात 'पुणे टॅलेंट सर्च' परीक्षेचे शुक्रवारी आयोजन

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे जवळपास चाळीस हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा मुख्याध्यापक संघ व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणित दिनानिमित्त शुक्रवारी (ता. 22 डिसें.) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे टॅलेंट सर्च (PTS) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे जवळपास चाळीस हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर यांनी दिली.

भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी 22 डिसेंबरला 'राष्ट्रीय गणित दिन' साजरा केला जातो. यानिमित्त मागील वर्षांपासून जिल्ह्यात पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व जिल्हा गणित अध्यापक संघ हे शिक्षण विभागाच्या पुढाकाराने गणित विषयाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची वीस गुणांची परीक्षा घेत आहेत.

मागील वर्षी 35 हजार मुलानी ही परीक्षा दिली होती. यावर्षी 450 शाळेतील 32000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याची नोंदणी वाढत असून उद्या सुमारे चाळीस हजार विद्यार्थी सकाळी अकरा ते बारा या वेळेत जिल्हाभर परीक्षा देतील हा एक विक्रमच असेल, अशी माहिती अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड यांनी दिली.

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ प्रश्नांची पूर्वतयारी व्हावी, तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी या हेतूने गणित विषयाची ही परीक्षा घेण्यात येते असे मत, गणित अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास शिंदे व सचिव सचिन घनवट यांनी दिली.

परीक्षेचे संपूर्ण नियोजन भारत काळे, कल्याण कडेकर, संदिप लोणकर, भगवान पांडेकर, नाना डुकरे, शंकर धावणे, नाना घळके, संजय गवळी, संजय पवळे, मारुती मांढरे, पांडुरंग आटोळे, स्मिता रावल, जितेंद्र त्रिवेदी, योगेश माळशिरसकर, दत्तात्रय रणनवरे, भाऊसाहेब सातपुते, अतुल क्षिरसागर, प्रविण ताजणे तसेच सर्व गणित अध्यापक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT