पुणे

एकीकडे फळबागांचा बहर तर दुसरीकडे तहानलेला शिवार!

CD

पारगाव मेमाणे, ता. २१ : पाझर तलाव फिडर योजनेतून पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील नाले व पाझर तलावात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी शेती सिंचनासाठी सोडले जाते. मात्र सर्वच शिवारासाठी वितरिकेची सुविधा नसल्याने पाणी गावाच्या सर्व भागांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी ऊस, कांदा, डोलणाऱ्या फळबागा तर दुसरीकडे सिंचनाच्या प्रतीक्षेत असलेला शिवार असा विरोधाभास दिसत आहे.

पारगावसाठी वरदान ठरणाऱ्या पुरंदर उपसा योजनेने गावाच्या दक्षिणेकडील सटवाई पाझर तलावात पुरंदर उपसाचे पाणी सोडले जाते. इथूनच बोरमाळ, टक्के वस्ती, भगत, जामदार, तळे, मैराळ, मेमाणेवस्ती गायरानवस्ती, शेरीमळा इत्यादी ठिकाणच्या क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी सात ते दहा अश्वशक्तीचे विद्युत पंप व सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या वितरिका वापरून पाणी उपलब्ध करून घेतले आहे. प्रत्येक वेळी पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. या पाण्याच्या भरवशावर येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बागायती केल्या आहेत. चारा पिके घेऊन दूध व्यवसायात प्रगती केली आहे. दरातील अनिश्चितता, शेती मालाचे पडते बाजारभाव याचा विचार करता ही पाणीपट्टी न परवडणारी आहे. माफक पाणीपट्टी असावी, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.


दरम्यान, इकडे बेलसरच्या शेतकऱ्यांनी मायनर टाकून सोय करून घेतली. शेकडो एकर शिवार सिंचनाखाली येत आहे. कानिफनाथ धरणालाही वितरिका मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.

कानिफनाथ तलाव ‘पुरंदर उपसा’च्या प्रतीक्षेत
पारगाव मेमाणेच्या उत्तरेकडील शिवारासाठी असलेला कानिफनाथ पाझर तलाव वितरकीच्या अभावाने आजही पुरंदर उपसा पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच दोन वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने पावसाळ्यात हा तलाव ठणठणीत कोरडा आहे. त्यामुळे कानिफनाथ, गुळवे, बालेघाट, पांढर, नारळीचा मळा इत्यादी वस्त्यांचा काही शिवार आजही सिंचनापासून वंचित आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी एकमताने पाठपुरावा केल्यास व इच्छाशक्ती दाखविल्यास त्यांचा प्रश्न नक्की मार्गी लागेल.

अशी टाकता येईल वितरिका
- सटवाई पाझर तलावातील वालव्हजवळ वितरिका टाकावी
- तेथून कानिफनाथ धरणात पाणी नेणे शक्य
- मात्र येथील प्राकृतिक रचनेचा विचार करता हे जिकिरीचे
- त्यापेक्षा दिवे लाइनवर सिंगापूरच्या बाजूने मायनर बसवावा
- वितरिका टाकल्यास कानिफनाथ धरणात पाणी सहज पोचू शकते.

00542, 00540

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT