one arrested for fraud as fake police at Navare shirr pune 
पुणे

तो आला, त्यानं लुटलं नंतर त्या तोतयाला पोलिसांनी पकडलं; शिरुरमधील घटना

नितीन बारवकर

शिरूर : ''मी पोलिस आहे, मला पैसे मागतोस का, तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो..''. अशी दमदाटी करीत कापड व्यावसायिकाच्या खिशातील दीड हजार रूपये बळजबरीने ओरबाडून पळून गेलेल्या तोतया पोलिसाला शिरूर पोलिसांनी नाकेबंदी करून गजाआड केले. काल(ता.14) सायंकाळी न्हावरे (ता. शिरूर) परिसरात हा प्रकार घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रमाकांत मारूती करपे (रा. गुनाट, ता. शिरूर) असे या तोतयाने आपले नाव सांगितले असून, शिरूर पोलिस त्याबाबत खातरजमा करीत आहेत. त्याच्याविरूद्ध तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुभाष साबळे (रा. न्हावरे) या कापड व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली.

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, साबळे यांचे न्हावरे येथील 'राजे कॉम्लेक्स' मध्ये कपड्याचे दुकान असून, आज दुपारी करपे हा त्यांच्या दुकानात आला. ''माझे सहकारी पोलिस कापरे यांनी, तुमच्या दुकानात चांगले कपडे मिळतात, असे सांगितल्याने इथे आलो. चांगले कपडे दाखवा'', असे म्हणून काही कपडे निवडले. साबळे यांनी या कपड्यांचे बील तयार करून देऊ केले असता, करपे याने, "कोणाला पैसे मागतोस, चक्क पोलिसाला. मी पोलिस आहे सांगितले ना. उलट तुच मला पाच हजार रूपये दे नाहीतर तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो", अशी दमदाटी करीत तो साबळे यांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्याशी झटापटी करून त्यांच्या खिशातील दीड हजार रूपये बळजबरीने ओरबाडून दुकानाबाहेर पळाला. त्यामुळे साबळे यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने न्हावरे दूरक्षेत्राचे सहायक फौजदार संजय कोलते यांना या प्रकाराची माहिती दिली. 

सहायक फौजदार कोलते यांनी तातडीने शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर खानापुरे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत तातडीने न्हावरे व परिसरात नाकेबंदीच्या सूचना पोलिसांना दिल्या. दरम्यान, सायंकाळी न्हावरे गावातीलच चौकात पोलिसांनी दूचाकी वरून पळून जाणाऱ्या करपे याला पकडले. त्याच्या ताब्यातील दूचाकी (क्र. एमएच ८० बीएन ७७२२) पोलिसांनी जप्त केली. तपासातून दूचाकीचा क्रमांकही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

पुणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट; अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची धांदल

पोलिस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करणाऱ्या व दीड हजार रूपये बळजबरीने हिसकावणाऱ्या करपे विरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT