Crime  sakal media
पुणे

Pune Crime : महिलेशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एकास अटक

या प्रकरणी ४२ वर्षीय महिला डॉक्‍टरने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोबाईलवर डॉक्‍टर महिलेशी बोलताना अश्लील संभाषण केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अलंकार पोलिसांनी अटक केली.

डॉ. सतीश कळसुरे असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय महिला डॉक्‍टरने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कळसुरे हा महापालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. त्याने त्याच्या सहकारी डॉक्‍टर महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

त्यावेळी बोलताना त्याने अश्लील संभाषण केले. तसेच डॉ. कळसुरे यांनी व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर अश्लील संदेश पाठवून महिला डॉक्‍टरची बदनामी करीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेनंतर महिलेने डॉ.कळसुरेविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT