One Arrested in Pune for smuggling gold through Chennai Express 
पुणे

चेन्नई एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याला पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केरळवरून चेन्नई एक्स्प्रेस रेल्वेतून सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तब्बल २४ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. त्याने दुबई येथून हे सोने घेऊन आल्याचे माहिती समोर आली आहे.साजिद महंमद मौलवी (वय ३०, रा. कासरगड, केरळ) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलवी हा केरळच्या आलमवडी तालुक्यात मुट्टतोडी येथे राहणारा आहे. लोहमार्ग पोलिसांकडून पुणे स्टेशन परिसरात सुरक्षिततेच्या कारणावरून संशयितांची झाडाझडती घेतली जाते. प्रवाशांचे पाकिट, मोबाइल आणि मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या रोखण्यासाठी गस्त घातली जाते.

'चेन्नई एक्सप्रेस गाडीतील एक व्यक्ती आहे. तिच्याजवळ सोन्याचे बिस्कीट असून, ती विक्री करण्यास जात आहे,' अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग अधीक्षक दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे स्थानकात गाडी आल्यानंतर त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ सोन्याची बिस्किटे सापडली. या सोन्याच्या कागदपत्रांबाबत विचारले असता ती त्याच्याकडे नसल्याचे दिसून आले. चौकशीअंती तो सोन्याची तस्करी करत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून २४ लाखांचे सोने, तीन मोबाइल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) ताब्यात देण्यात आले आहे.

मौलवी दुबईवरून सोने घेऊन आला होता. तिथून तो कोचिन विमानतळावर आला. त्यानंतर लागलीच रेल्वेने मुंबईला या सोन्याची विक्रीसाठी जात होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT