पुणे

पुणे : विद्यार्थ्यांनो, आता दप्तराचा भार विसरा; कारण...

गजेंद्र बडे

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील ६६ तालुक्यांमध्ये 'एक पुस्तक, एक वही' हा अनोखा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याची निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुळचा पुणे जिल्हा परिषदेचा असलेला हा उपक्रम आता राज्यभर सुरु होणार आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुणे जिल्हा परिषदेने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमामुळे इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक आणि सर्व विषयांसाठी एकच वही घेऊन शाळेत जावे लागणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे पूर्णपणे हलके होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या एकाच पुस्तकात सर्व विषयांचे प्रत्येकी एक प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना सर्ध विषयांचे स्वतंत्र पुस्तक शाळेत न्यावे लागणार नाही. शिवाय  दर महिन्याला नवे पुस्तक मिळू शकणार आहे.

राज्यात हा अनोखा उपक्रम राबविण्यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पुढाकार घेतला आहे. यानुसार शिक्षण परिषदेच्यावतीने समग्र शिक्षण मोहिमेंतर्गत या पुस्तकांचा एकात्मिक संच विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमाचे फायदे

- दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत.

- विद्यार्थ्यांचा दप्तर आवरण्याचा वेळ वाचेल.

- दर महिन्याला नवे पुस्तक मिळणार. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद वाढू शकेन.

- वर्षाच्या शेवटी फाटकी पुस्तके वापरावी लागणार नाहीत.

-  अभ्यासक्रम शिकविण्यात सर्व शाळांमध्ये समानता राहिल.

- मोठमोठी पुस्तके पाहून विद्यार्थ्यांना वाटणारी अभ्यासाची भीती कमी होईल.

- हलके फुलके पुस्तके पाहून अभ्यास करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. 

राज्यात पहिल्यांदा पुणे

जिल्हा परिषदेने हा उपक्रम स्वखर्चाने राबविला होता. हा उपक्रम दप्तराचे ओझे कमी होण्यास उपयुक्त असल्याने, संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबविण्यास परवानगी आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, हाच उपक्रम केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता राज्यभर सुरु झाला आहे. ही आनंदाची बाब आहे.

- रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती
जिल्हा परिषद, पुणे.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT