One of Chhota Rajan gang member arrested in Pune who absconded for 6 year 
पुणे

छोटा राजन टोळीतील एकाला पुण्यात अटक; ६ वर्षांपासून होता पसार

सकाळवृत्तसेवा

पुणे : जमिनीच्या व्यवहारातून पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकांकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंड छोटा राजन टोळीतील हस्तकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा हस्तक गेल्या सहा वर्षांपासून फरार होता.

परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) असे त्यांचे नाव आहे. त्याला कोंढव्यातून अटक करून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबईतील पथकाकडे सोपविण्यात आले आहे. पनवेलमधील एका बांधकाम व्यावसायिकांची येथील मार्केटयार्ड परिसरात जमीन आहे. या जमिनीच्या मालकीबाबतची कोणतीही कागदपत्रे नसताना ठक्कर यांनी जमीन स्वत:च्या मालकीची आहे, अशी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही कागदपत्रे घेऊन ठक्कर मुंबईतील कुख्यात गुंड अश्विन नाईक याच्याकडे गेला आणि या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली. नाईकने त्याला नकार दिला. त्यानंतर ठक्करने राजन टोळीतील गुंड सुरेश शिंदे (रा. चेंबूर, मुंबई) याच्याशी संपर्क साधला. शिंदेने तेथून बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. २६ कोटी रुपये खंडणी दिल्यास प्रकरण मिटवून टाकतो, अशी धमकी त्याने दिली होती.

ठक्कर कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांनी ‘सीबीआय’च्या पथकाला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार ठक्करला कोंढवा भागातून अटक करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, योगेश जगताप, अजय थोरात, सचिन जाधव, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी ही कारवाई केली.

गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत होता पसार :
बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी छोटा राजनसह सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून ठक्कर पसार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

SCROLL FOR NEXT