पुणे

Pune : मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळवा कोरोना रिपोर्ट

कोरोनाची चाचणी झाल्यानंतर आता रिपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला कोव्हिड केंद्रावर जाण्याची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाची चाचणी झाल्यानंतर आता रिपोर्ट (Corona Report) मिळविण्यासाठी तुम्हाला कोव्हिड केंद्रावर जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलवरच एका क्लिकमध्ये हे सर्व रिपोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

भारतीय वैद्यक संशोधन संस्था अर्थात आय सी एम आर ने एका संकेतस्थळावर सर्व भारतीयांनी आजवर केलेल्या कोरोना चाचणीचे(Corona Test) निकाल उपलब्ध करून दिले आहे. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात आपल्याला हा निकाल मिळविता येतो.

आपल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून चुटकी सरशी आपल्याला हा निकाल मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला तासंतास रांगेत उभे राहण्याची किंवा निकालाची वाट पाहण्याची गरज नाही. तसेच कार्यालयीन वापरासाठी आपल्याला सहज निकालाची प्रत मिळणार आहे. यासाठी कोरोना चाचणी घेत असताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक नोंदविला होता त्याची गरज भासणार आहे. हा क्रमांक संबंधित संकेतस्थळावर टाकून आपल्याला आजवर केलेल्या सर्व कोरोना चाचण्या मिळतात.

अशी आहे प्रक्रिया :

- सर्वात प्रथम https://report.icmr.org.in/index.php या संकेतस्थळावर जा

- चाचणीच्यावेळी दिलेला मोबाईल क्रमांक इथे टाका

- एन्टर केल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल

- हा ओटीपी एन्टर केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आजवर केलेल्या कोरोना चाचण्या दिसतील

- नमुना दिल्याची तारीख, निदान झाल्याची तारीख, आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी, निकाल अशी सर्व माहिती स्क्रीनवर दिसते

- सर्वात शेवटच्या रकान्यात डाउनलोडचा पर्याय दिसतो

- त्यावर क्लिक करा आणि मिळवा आपला कोरोना रिपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT