Hanged eSakal
पुणे

लोणी काळभोर येथे एकाची आत्महत्या

लग्नाला घेऊन न गेल्याच्या कारणावरून गळफास घेतला

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - लग्नाला घेऊन न गेल्याच्या कारणावरून एकाने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिराजवळ घडली आहे. आण्णा रामचंद्र पवार (वय ५२, रा. पाषाणकर बाग, महादेव मंदीराशेजारी, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आण्णा पवार यांचा पुतण्याचा विवाह बारामती या ठिकाणी होता. त्यामुळे आण्णा पवार यांना घरी सोडून सर्वजण सदर विवाहासाठी निघून गेले होते. पुतण्याच्या विवाहासाठी आपणास नेले नसल्याचा राग आला. या रागाच्या भरात आण्णा पवार यांनी शुक्रवारी (ता. २७) घराजवळ असलेल्या फाळणीच्या काटेरी झाडास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर बाब परिसरात रहात असलेल्या अनिकेत अंकुश मुळीक ( वय २५) या तरुणाचे लक्षात येताच त्याने पोलिसांना हि माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलीस हवालदार संतोष राठोड, घनश्याम आडके, अजय कटके हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गळफास सोडवून आण्णा पवार यांना खाली घेतले व उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पालघरमध्ये कलर कंपनीला भीषण आग; केमिकलच्या भडक्याने आगीचा लोट

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT