पुणे

पुणे विभागात एक कोटी 94 लाख मतदार 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघांत 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले असून, प्रशासन सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

दहा लोकसभा मतदारसंघांत 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश उस्मानाबाद मतदारसंघात होतो. चार मतदारसंघ पुणे जिल्ह्यात, तर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे आणि पद 

मावळ - कविता द्विवेदी (अपर जिल्हाधिकारी पीएमआरडीए), पुणे - नवल किशोर राम (जिल्हाधिकारी, पुणे), बारामती - सुभाष डुंबरे (अपर आयुक्त, पुणे), शिरूर - रमेश काळे (अपर जिल्हाधिकारी, पुणे), सोलापूर - (अनु.जाती) डॉ. राजेंद्र भोसले (जिल्हाधिकारी, सोलापूर), माढा - रामचंद्र शिंदे (अपर जिल्हाधिकारी, सोलापूर), सांगली- डॉ. अभिजित चौधरी (जिल्हाधिकारी, सांगली), सातारा -श्वेता सिंघल (जिल्हाधिकारी, सातारा), कोल्हापूर - दौलत देसाई (जिल्हाधिकारी, कोल्हापूर), हातकणंगले - नंदकुमार काटकर (अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर) 

मतदारांना ओळखपत्रे 
पुणे विभागातील मतदारसंघात 1 कोटी 70 हजार 460 पुरुष आणि 93 लाख 25 हजार 948 स्त्री मतदार आहेत. 347 तृतीयपंथी मतदार, असे एकूण 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 1 कोटी 81 लाख 74 हजार 468 व्यक्‍तींना मतदार ओळखपत्र मिळाले आहे. 

मतदान केंद्रांवर सुविधा 
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, मदत कक्ष, स्वच्छतागृह, विजेची सोय, दिव्यांग व्यक्‍तींसाठी रॅम्प यांचा समावेश आहे. 

निवडणुकीसाठी तयारी - 
निवडणूक विषयक कामकाजासाठी 1 लाख 68 हजार 636 अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विविध कामांसाठी पथके स्थापन केली आहेत. खर्च देखरेख, व्हिडिओग्राफर, सूक्ष्म निरीक्षक, विभागीय अधिकाऱ्यांसह भरारी पथकांचा समावेश आहे. आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा दिली आहे. सैन्यातील सर्व्हिस वोटर्ससाठी ईटीपीबीएस (इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सर्व्हिस) या वेळी नव्याने देण्यात येणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे हाताळण्यासाठी पुणे विभागात 11 हजार 747 ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. त्यात 7 लाख 57 हजार 111 मतदारांनी ही यंत्रे हाताळली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

राज्यातील लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा! २०११ पूर्वीच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता; महायुती सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT