pune-city 
पुणे

पुण्यामध्ये दिवसभरात सर्वाधिक ४४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ना बेड ना व्हेंटिलेटर मिळत असतानाच या रोगाच्या मृतांचा आकडा गेल्या चार दिवसांच्या तुलनेत तिपटीने वाढला आहे. रविवारी दिवसभरात सर्वाधिक ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांशी रुग्ण हे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतांमध्ये ३९ ते ५० वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश असून, मृतांमध्ये ३४ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. एकाच दिवसांत इतक्या जणांचा मृत्यू झाल्याने पुण्यात घबराट निर्माण झाली आहे. सर्व मृतांना कोरोनासोबत अन्य आजारही होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी एका दिवसात सर्वाधिक २५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, तोच आकडा जवळपास दुप्पट झाल्याने पुणेकरांत भीती आहे. कोरोनाच्या मृतांचा एकूण आकडा ९७६ इतका झाला आहे. तर त्याचवेळी आणखी पावणेसहाशे रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, पुढच्या महिना-दीड महिन्यांत तो आणखी याविण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून रुग्णांचा शोध घेत, त्यांना विलग करणे, योग्य आणि वेळेत उपचार करण्यासाठी महापालिका आणि खासगी होस्पिटलची व्यापी वाढविण्यात येत आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये बेड अपुरे ठरत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही चार-पाच दिवसांपासून व्हेंटिलेटर तर 'आयसीयू' मिळत नसल्याचे रूग्णांचा अतोनात हाल सुरू आहेत. त्याचवेळी एका दिवसांत म्हणजे गेल्या चोवीस तासांत ४४ जणांचा जीव गेल्याने पुन्हा भीती वाढली आहे. 

पुण्यातील रुग्ण संख्या 
नवे रुग्ण -  १ हजार ५०५ 
कोरोनामुक्त  -  ५५७ 
मृत्यू  - ४४ 
तपासणी -  ३ हजार ८१५ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT