Accident Sakal
पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकी गाडीच्या अपघातात एक ठार; तीन जखमी

भरधाव जाणाऱ्या चारचाकी गाडीने दुभाजकाचे लोखंडी बॅरेगेट तोडून समोरील लेनवरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरात धडक दिली.

सावता नवले

भरधाव जाणाऱ्या चारचाकी गाडीने दुभाजकाचे लोखंडी बॅरेगेट तोडून समोरील लेनवरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरात धडक दिली.

कुरकुंभ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहत कार्यालयासमोरील चौकात पुण्याकडून भरधाव जाणाऱ्या चारचाकी गाडीने दुभाजकाचे लोखंडी बॅरेगेट तोडून समोरील लेनवरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात एका वृध्द व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर आणखी तीन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास घडला.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोरील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उतारावरून पुण्याकडून भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीच्या (एमएच. 04, एचएम. 7906) चालकाचा ताबा सुटल्याने या गाडीने दुभाजकावरील लोखंडी बॅरेगेट तोडून समोरील लेनवरून पुण्याकडे जाणाऱ्या दुसर्‍या चारचाकी गाडीला (एमएच. 42, के. 7759 ) जोरात धडकून भीषण अपघात झाला.

या अपघातात रामदास किसन झगडे (वय 65, रा. सिद्धेश्वर निंबुडी, ता. बारामती, जि. पुणे) याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर प्रमोद रामदास झगडे, सुरेखा रामदास झगडे, सुलेमान खुदबुद्दीन सय्यद हे तीन जण जखमी झाले. मयत रामदास झगडे हे तीघे जखमी झाले. धडक जोरात झाल्याने दोन्ही गाड्यांच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्याचे समजताच ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी पाटस येथील रूग्णालयात पाठवल्याची माहिती घटनास्थळीच्या ग्रामस्थांनी दिली. यासंदर्भात अजून पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

Navi Mumbai Airport : नवी मुंबईतून आता जळगाव- सिंधुदुर्ग-गोवा अन् अगात्तीला थेट विमानसेवा; नव्या मार्गांमुळे प्रादेशिक हवाई संपर्क वाढला

Video : वांद्रेत खळबळ! विजेच्या खांबावरून ८ फुटांच्या अजगराची सुटका, पाहा रेस्क्यूचा थरार

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT