One died in Acccindent of Tempo Travel and two wheeler in BRT Lane 
पुणे

पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलर अन् दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बीआरटी मार्गातून भरधाव जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीस्वारास समोरुन धडक दिल्यामुळे झालेल्या अपघाताना दुचाकीस्वाराच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास संगवाडीजवळील बीआरटी मार्गामध्ये घडली. 

धनंजय गोविंद वाळुंज (वय 24, रा. वेताळे, खेड) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप भानुदास रुके (वय 30, रा. कान्हेवाडी बुद्रुक, खेड) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''धनंजय वाळुंज हे फिर्यादी रुके यांचे मामेभाऊ आहेत. वाळुंज रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन संगमवाडी येथून पाटील इस्टेट कडून येरवड्याच्या दिशेने बीआरटी मार्गातून जात होते. संगमवाडी येथून शादलबाबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या एक किलोमीटर पुढे जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांना समोरुन जबर धडक दिली. त्यामध्ये वाळुंज यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.

दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने या अपघाताबाबत पोलिसांना खबर न देता तेथून पळून गेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे करीत आहेत. 


बीआरटी मार्गातून पीएमपी बस, एसटी, रुग्णवाहिका अशा वाहनांना जाण्याची परवानगी आहे. असे असतानाही खासगी वाहनचालक रिकामा रस्ता पाहून बीआरटी मार्गातुन जाण्यास प्राधान्य देतात. बहुतांश वाहने भरधाव असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. बीआरटी मार्गातून खासगी वाहने मोठ्या प्रमाणात जाऊन अपघात घडत असूनही महापालिका व पीएमपीएल प्रशासनाकडून या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहीले जात नसल्याची सद्यस्थिती आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT