Crime 
पुणे

पुणे : कॅनॉलमध्ये बुडाल्याने एकाचा मृत्यू; धायरी फाटा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता येथील धायरी फाट्याजवळ असणाऱ्या कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२८) घडली. सुनील रामजित सारेन (वय ३६, रा. बारंगळे मळा, धायरी, पुणे मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

धायरी फाटा परिसरात असणाऱ्या कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एका व्यक्तीने कंट्रोल रुमला याची खबर दिली. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह दिसून आला.

दरम्यान पोलिसांनी याची माहिती सनसिटी अग्निशमन दलाला दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित दोरखंडाच्या सहाय्याने कालव्यातून मृतदेह बाहेर काढला. मयत सुनील सारेन हे सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT