पुणे

महावितरणच्या 68 हजार ग्राहकांनी भरली शंभर कोटींची थकबाकी 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट, प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू व थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला असल्याचे समोर आले आहे. 

पुणे परिमंडलात लॉकडाउनच्या मार्च, एप्रिल व मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा 50 टक्‍क्‍यांपर्यंत खालावला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला. सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 11 लाख 65 हजार ग्राहकांकडे 794 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शंका निरसन करण्यासाठी वेबिनार 
लॉकडाउनमधील वीजबिलांबाबत शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत जूनपासून आतापर्यंत 97 वेबिनार व 115 मेळावे घेण्यात आले. तर 286 ठिकाणी ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये सुमारे 4 लाख 2 हजार वीजग्राहकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. मात्र वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

थकबाकीचा भरणा 
विभाग ग्राहक भरणा (आकडे रुपयांत) 
पुणे शहर 26 हजार 725 43 कोटी 60 लाख 
पिंपरी व चिंचवड 16 हजार 900 23 कोटी 90 लाख 
आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे 24 हजार 700 32 कोटी 10 लाख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT