One killed, five injured in two-wheeler accident in pimpri  
पुणे

टु व्हिलरची लावली रेस; आरश्यात आरसे अडकले अन् गमावला...

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन(पुणे) : क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलांच्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हॅन्डल एकमेकांत अडकून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे जवळील बेगडेवाडी रेल्वे फाकटाच्या जवळ शनिवारी (ता.१४) रात्री अकराच्या दरम्यान हा अपघात घडला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
अपघातातील सर्व मुले मावळ तालुक्यातील परंदवाडी आणि धामणे येथील आदीवासी ठाकर समाजाची असून इंदोरी येथे क्रिकेट खेळायला गेली होती.इंदोरी येथे क्रिकेटचे सामने खेळुन परत घरी येत असताना शेलारवाडी गावचे हद्दीत आर्मी कँम्पचे कंपाउंड भिंतीच्या बाजूला सर्विस रोडवरुन जात असताना मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. त्यात गंभीर जखमींना सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दुचाकीस्वार संजय रघुनाथ केदारी (२२,परंदवडी ता.मावळ जि. पुणे) हा उपचारा दरम्यान मयत झाला.

Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; पुण्यात तर...

सचिन पांडुरंग ठाकर, सुरेश रामा केदारी, अरुण भरत केदारी, सुनिल रामदास पवार,अर्जुन महादू गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. तिसऱ्या दुचाकीवरील दोघे दिपक सप्रे व नकुळ गराडे (धामणे, मावळ) हे अपघातातून बचावले. याप्रकरणी सचिन पांडुरंग ठाकर (१५,परंदवाडी,मावळ) याच्या फिर्यादीवरुन दुसरा दुचाकीस्वार सुनिल पवार याच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्टंटबाजी करत लागलेल्या रेसमधून हा प्रकार झाल्याची शाशंकता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT