माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  sakal
पुणे

पारगाव: बैलगाडा घेऊन जाणार्या टेम्पोच्या अपघातात एक ठार चार जखमी

अपघातात एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले

सुदाम बिडकर

पारगाव : लोणी ता आंबेगाव गावाच्या हद्दीत पाबळ ते लोणी रस्त्यावर बैलगाडा घेऊन जाणार्या पिकअप टेम्पोचा मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले हा अपघात काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झाला.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शिरापूर ता. पारनेर जि.अहमदनगर येथील दत्ता अशोक चाटे हे त्याच्या पिकअप टेम्पो मधून दोन बैल , एक घोडी व एकूण १३ जणांना घेऊन नानोली (ता. मावळ) येथे बैलगाडा शर्यतीसाठी गेले होते शर्यती नंतर पुन्हा राजगुरुनगर, पाबळ मार्गे गावी शिरापूर येथे जात असताना लोणी गावाच्या हद्दीत हाँटेल परंपरा समोर पिक अप टेम्पोचा मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला टेम्पो चालक दत्ता चाटे हा अपघाताची खबर न देता तसेच जखमीची विचारपूस न करता टेम्पोचा टायर बदलून टेम्पो घेवून पळून गेला या अपघातात टेम्पोच्या हुडावर तसेच केबिन वर बसलेले खाली पडले यामध्ये आकाश राजू लोणकर (वय 30 वर्षे रा. शिरापुर ता. पारनेर ) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर रविंद्र काशिनाथ माळी , रोशन सुभाष माळी, लखन भानुदास माळी ( तिघेही रा.चोंबुत ता. पारनेर ) हे तिघे जखमी झाले. त्यांच्यावर मंचर येथे उपचार सुरु आहे चौथा जखमी नाव समजू शकले नाही तो गंभीर जखमी असल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. टेम्पो चालक पळून गेल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या जखमींना स्थानिक ग्रामस्थ शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, पोलीस पाटील संदीप आढाव, बाळासाहेब कदम, बाळशिराम वाळुंज, सतीश थोरात, राकेश जंगम व रुग्णवाहिका चालक संदीप घुले, गणेश शिंदे यांनी जखमींना उपचारासाठी मंचर येथे घेऊन गेले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले , सागर काजळे , शिवाजी राजगुरू , देविदास दरेकर होते. जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असे श्री. आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले. टेम्पो चालक दत्ता अशोक चाटे याच्या विरुध्द मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार संजय नाडेकर करत आहे.मंचर ता. आंबेगाव : लोणी येथील टेम्पो अपघातातील जखमींची विचारपूस करताना माजी

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Explained: NDA अंतर्गत मोठा राडा! मोदींच्या खुर्चीला देखील हादरे, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक महापालिकेची मोठी मागणी: ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करणार

सदावर्ते गट-शिंदे गटात राडा; एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी

INDW vs AUSW: चुकीला माफी नाही! भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलंच, पण ICC नेही सुनावली शिक्षा

Vasu Baras Marathi Wishes: आली दिवाळी ,आली दिवाळी...! मित्रपरिवाराला अन् नातेवाईकांना पाठवा मराठीतून वसुबारच्या खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT