DBT  sakal
पुणे

DBT : ‘डीबीटी’चे पैसे आठवड्यात मिळणार ;पुणे महापालिका शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठीचे पूर्वगणनपत्रक मागवून त्यानंतर रक्कम ठरविण्याच्या प्रक्रियेला यंदा डावलण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठीचे पूर्वगणनपत्रक मागवून त्यानंतर रक्कम ठरविण्याच्या प्रक्रियेला यंदा डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यापासून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर - डीबीटी) शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी रक्कम जमा होण्‍यास सुरुवात होणार आहे. याचा फायदा एक लाख तीन हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

महापालिकेत कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी निविदा काढली जाते. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठीही निविदा काढली जात होती. पण या निविदा म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याने विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा फायदा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनाच होत होता. भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य, गणवेश पुरविले जात होते.

हा प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेने २०१७ पासून गणवेश, स्वेटर, बूट, स्वेटर, दप्तर, वही, पेन्सील, पेन यांसह इतर शैक्षणिक साहित्याची खरेदी थांबविली. त्याऐवजी याचे पैसे थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार थांबला पण शाळा जून महिन्यात सुरू झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिना

उजाडत होता. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच साहित्य मिळायला पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून वस्तूंचे दर निश्‍चित करण्यासाठी बाजारातून पूर्वगणनपत्रक मागविण्यात येत होते. या प्रक्रियेत तीन - चार महिने वाया जात होते. त्यामुळे पूर्वगणनपत्रक न मागविण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी गेल्या वर्षीच्या रकमेत १० टक्के वाढ करून ती रक्कम निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. प्रत्येक इयत्तेच्या गरजेनुसार दोन हजार रुपयांपासून ते सहा हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा केली जाणार आहे.

यंदाच्या वर्षी एक लाख तीन हजार विद्यार्थ्यांना ५० कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम ‘डीबीटी’तून वाटप केली जाणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची माहिती, बँक खाते क्रमांक ही माहिती सिस्टिममध्ये टाकली जात आहे. पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

- सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Accident in Kolhapur : कोल्हापुरात भीषण अपघात भरबाजारात घुसले वडाप, एका महिलेचा मृत्यू, दोन महिला गंभीर

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

पुण्यात PMPL बसची दुचाकीला मागून धडक, तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT